esakal | गणेश मंडळ कार्यकर्त्यांना ‘सिंहासना’साठी साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

NCP was preparing to win the assembly elections

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारीला लागला असून, सत्तेचे सिंहासन गाठण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना साकडे घालणार आहे.

गणेश मंडळ कार्यकर्त्यांना ‘सिंहासना’साठी साकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 :

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारीला लागला असून, सत्तेचे सिंहासन गाठण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना साकडे घालणार आहे. विधानसभा मतदारसंघांतील बैठका आटोपल्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी मंडळांच्या बैठका आणि गाठीभेटी घेणार आहेत. आपापल्या भागातील मंडळांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचे फर्मान पदाधिकाऱ्यांना शहर नेतृत्वाने धाडले आहे. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांची फळी पक्षसंघटनेशी जोडली जाण्याची आशा नेत्यांना आहे.

पक्षांतराचा सपाटा सुरू असतानाच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकांच्या कार्यक्रमांसह पक्षाने शहर स्वच्छतेसह महिला, युवती आणि युवक आघाडीच्या माध्यमातून कार्यक्रम आखले आहेत. यापैकी काही कार्यक्रमांचा ‘श्रीगणेशा’ करून आघाड्यांचे प्रमुख कामाला लागले आहेत. त्यातच निवडणुका जिंकण्यासाठी उपयुक्त ठरणारे मेळावे, बैठका, शिबिरही घेण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती होताच मतदारसंघनिहाय पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर आता गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांसह उपनगरांतील मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. 

याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, ‘‘केवळ निवडणुका म्हणून नव्हे; तर पक्ष वाढविण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यातूनच विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहोत. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने मंडळांना भेटी देणार आहे.’’ 

दरम्यान, निवडणुकांचा काळ असला तरी, शहर स्वच्छतेची मोहीम सुरू राहणार असून, लोकांपर्यंत पोचून वैयक्तिक  आणि सार्वजनिक स्वच्छतेला हातभार लावला जाईल, असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. 

loading image
go to top