G20 Pune : 'जे चुकीचं आहे ते चुकीचं'; राष्ट्रवादी G20 च्या प्रतिनिधींसमोर भाजपचा करणार पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

G20 Pune

G20 Pune : 'जे चुकीचं आहे ते चुकीचं'; राष्ट्रवादी G20 च्या प्रतिनिधींसमोर भाजपचा करणार पर्दाफाश

जी-२० परिषदेचं आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, चीन, जपान जर्मनी यानंतर भारत पाचव्या क्रमांकावर येण्याच्या प्रयत्नात आहे, असंही राणे म्हणाले आहेत.

तर यावरून पुण्यात पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिका आयुक्त भाजपची पाठराखण करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. जी २० परिषद वरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज टीका केली आहे. महापालिका आयुक्त हे प्रशासक आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या सूचनानुसार काम करतात. खरी वस्तुस्थिती त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडायला हवी होती असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

ज्या ठिकाणी जी २० चे प्रतिनिधी जात आहेत त्या ठिकाणी चुकीची रंगरंगोटी करणे हे भाजपकडून सुरू आहे. उद्यापासून पुण्यात राष्ट्रवादी अनेक गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जी २० चे प्रतिनिधी पुण्यात येतात हे आमच्यासाठी अभिमान आहे पण जे चुकीचे आहे ते जगासमोर यावे यासाठी उद्यापासून पर्दाफाश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: Kasba Election : 'कसबा झालाय भकास...', पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून पुण्यात पोस्टरबाजी

शासकीय कार्यक्रमाला भाजपचे काय काम आहे. भाजप जी २० परिषदेला देखील राजकरण करत आहेत असा घणाघाती आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

हेही वाचा: Gulabrao Patil : "अजित पवारांनी पहाटेची चूक सुधारली! पण उद्धव ठाकरे..."

टॅग्स :BjppuneNCP