साडेसतरानळीच्या प्राथमिक सुविधांसाठी राष्ट्रवादीचा मोर्चा

कृष्णकांत कोबल
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा नेण्यात आला होता. 

मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा नेण्यात आला होता. 

माजी सरपंच संदीप तुपे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोर्चात गावातील महिला व पुरूष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अनेक महिला हंडा घेवून मोर्चात आल्या होत्या. हातात फलक घेवून व घोषणा देत नागरिक साडेसतरानळी गाव ते क्षेत्रीय कार्यालयापर्यंत चालत आले होते. अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी दिले. पाणी पुरवठा सुरळीत करावा, व्हाल्व व जलवाहिनी दुरूस्त करावी, वाढलेली भटकी कुत्री व डुकरांचा बंदोबस्त करावा, मोठ्या प्रमाणात खराब झालेले रस्ते व ड्रेनेजची दुरूस्ती करावी अशा मागण्या निवेदनात केलेल्या आहेत. सध्या रात्री अपरात्री पाणी येत असते. अगोदरच अपुरे असलेले हे पाणी नादुरूस्त वाहिन्यांमधून ते मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. ठिकठिकाणी पाण्याची तळी साचत आहेत, अशा तक्रारी महिलांनी यावेळी केल्या.

माजी सरपंच कांचन तुपे, माजी उपसरपंच रूपेश तुपे, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, नगरसेवक मारूती तुपे, पाणी पुरवठा अधिकारी इंद्रजित देशमुख, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डॉ. संजय घनवट यांच्यासह मोठ्या संख्येतील महिला यावेळी उपस्थित होत्या.

संदीप तुपे म्हणाले,""सध्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्र्नाबरोबरच आरोग्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. कमी पाणी पुरवठा, वितरणाचे नियोजन नाही. प्राथमिक सुविधांबाबत पाठपुरावा करूनही दाद दिली जात नाही. त्यामुळे मोर्चा काढावा लागला आहे. दिलेल्या अश्र्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास पुन्हा व्यापक आंदोलन करण्यात येईल.''

"साडेसतरानळीला दररोज दुपारी दोन ते पाच या तीन तासात पाणी पुरवठा केला जात आहे. ते पाणी पुरेसे नसल्याने रविदर्शन येथील वाहिनीवर असलेला दोन इंची टॅप चार इंची केला जाईल. त्यामुळे येथील पाण्याचा प्रश्र्न सुटण्यास मदत होईल.''
इंद्रजित देशमुख, पाणीपुरवठा अधिकारी

"गेली अनेक वर्षे सत्ता असूनही या सर्व सुविधा का पुरवू शकले नाहीत. यामध्ये नागरिकांसाठीचा कळवळा नसून भाजप विरोधात केवळ आगपाखड आहे.'
भूषण तुपे, उपसभापती, बाजारसमिती, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's Front for primary services in baramati