

नेकलेस रस्त्यासाठी
गुरुवारी सादरीकरण
कऱ्हाडच्या प्रकल्पाला मिळणार गती
कऱ्हाड, ता. ७ ः ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील स्मृतिस्थळाचा कायापालटसह शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी नेकलेस रस्त्याच्या कामाला प्रशासकीय पातळीवर गती आली आहे. दोन्ही प्रकल्पांचे गुरुवारी (ता. १३) पालिकेच्या सभागृहात सविस्तर सादरीकरण होणार आहे. दुपारी चारला सादरीकरण होईल, अशी माहिती पालिकेतून देण्यात आली. त्या बैठकीत पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीही सहभागी होतील.
येथील प्रीतिसंगमालगत यशवंतराव चव्हाण समाधी परिसर आहे. त्याचे जतन व सुशोभीकरणासाठी शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत विशेष निधी व प्रकल्प आखला आहे. त्याअंतर्गत समाधी परिसराचे सुशोभीकरण, पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा आणि स्मृती परिसर विकसित करण्याचे नियोजन आहे. त्याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून शहराला नदीपात्राच्या बाजूने नेकलेस रस्ता प्रस्तावित केला आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर कृष्णा-कोयनेच्या काठावर रस्ता विकसित केल्यास शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासह पर्यटनाला वाव मिळणार आहे. त्याच्या नियोजनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती केली आहे. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय अभियंत्यांना पत्र पाठवून बैठकीचे आयोजन केले. त्यानुसार गुरुवारी बैठक होत आहे. बैठकीत प्रकल्प व्यवस्तापन समितीतर्फे प्रत्यक्ष नकाशा, आवश्यक असणारी जमीन, निधीची उपलब्धता आणि कामाची मुदतीबाबत सादरीकरण होईल.
यावर राहील फोकस
* स्मृतिस्थळ परिसर विकास ः यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाचे सुशोभीकरण व पर्यटन सुविधा
* नेकलेस रस्ता ः प्रस्तावित रस्त्याचा तांत्रिक आराखडा, भूसंपादन, कागदपत्रांचा आढावा
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.