
गाव स्वच्छ, सुंदर, हरित व आदर्श होण्यासाठी सर्वांनी प्राधान्य देणे ही काळाची गरज
इंदापूर - राज्यात पावणे नऊ लाख तर तालुक्यात २०६६ घरकुल बांधकाम करण्याचे प्रस्ताव असून शंभर टक्के मंजूर किंवा प्रस्तावित घर कुल बांधले जातील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, घरकुल बांधणी बरोबरच गाव स्वच्छ, सुंदर, हरित व आदर्श होण्यासाठी सर्वांनी प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर पंचायत समितीत लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात महाआवास अभियान ग्रामिण टप्प्या २ या तालुकास्तर कार्यशाळेचा शुभारंभ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून आदर्श गोपालक शेतकरी डॉ. वसंत दगडे व त्यांच्या पत्नी डॉ. रिता यांचा सत्कार मंत्री भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रताप पाटील, हनुमंत बंडगर,सचिन सपकळ, बाळासाहेब काळे, सतीश पांढरे, रणजित निंबाळकर, शुभम निंबाळकर, सागर मिसाळ, अनिकेत वाघ हे मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा: एसआरटी मधील सिंहगड स्पर्धा साहिल नायर व वीणा जगनाडे यांचा प्रथम क्रमांक
श्री. भरणे पुढे म्हणाले, घरकुला संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ, आमदार तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. मात्र सरपंच, ग्रामसेवक व संबंधितांनी कागदोपत्री अडचण न आणता पुण्याचे काम समजून पात्र लाभार्थींसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी घरकुला संदर्भातील अडचणी विशद करून घरकुलांची माहिती दिली. यावेळी तालुक्यातील शेटफळ गढे येथे वैशिष्ट्यपूर्ण घरकुल उभारले गेले असून घरकुल उभारणीसाठी ७५ गवंडयाना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुत्रसंचलन सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र शिंदे व संतोष गदादे यांनी केले.
Web Title: Need Hour Is For Everyone To Give Priority To Make The Village Clean Beautiful Green And Ideal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..