Pune : सुरक्षितेच्या दृष्टीने अधिक दक्ष रहाणे आवश्यक : पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


सुरक्षितेच्या दृष्टीने अधिक दक्ष रहाणे आवश्यक : पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख

सुरक्षितेच्या दृष्टीने अधिक दक्ष रहाणे आवश्यक : पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख

नारायणगाव : जास्तीत जास्त पोलीस पथके तैनात करून चौदा नंबर येथील अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेवर सशस्त्र दरोड्याचा तपास करण्यात येईल. दरोडेखोरांनी ग्रामीण भागातील एटीएम, बँका व पतसंस्था लक्ष केल्याचे या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.आर्थिक संस्थानी सुरक्षितेच्या दृष्टीने अधिक दक्ष रहाणे आवश्यक आहे.आशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्गालगत भर वस्तीत असलेल्या अनंत ग्रामिण पतसंस्थेवर दोन अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी व्यवस्थापकावर गोळीबार करून व महिला लिपिकाला धमकावून सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम लुटली. या घटनेत व्यवस्थापक राजेंद्र भोर ( वय ५२)यांचे उपचारापूर्वी निधन झाले.आज सायंकाळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी भेट देऊन माहिती घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.डॉ. देशमुख म्हणाले ऑक्टोबर महिन्यात पिंपरखेड (तालुका शिरूर ) येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता.

या घटनेतील आरोपींना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात यश आले आहे.चौदा नंबर येथील आजची घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनांवरून दुपारी गर्दी कमी असताना किंवा जेवणाच्या सुट्टीत आशा घटना घडत आहेत. या मुळे पतसंस्था, बँका या आर्थिक संस्थानी सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी. सेंट्रल अलार्म,हॉट लाईन, गार्डची नेमणूक आदी उपाययोजना करण्याची गरज आहे.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पहाता चोरीच्या उद्देशानेच व्यवस्थापकावर एक राउंड फायरिंग केली आहे.

loading image
go to top