esakal | पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज

बोलून बातमी शोधा

कोथरूड - महापौर मुरलीधर मोहोळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी (डावीकडून) चंद्रकांत मोकाटे, रमेश बागवे, शशिकांत सुतार, चंद्रकांत पाटील, मोहोळ, मोनिका मोहोळ, फडणवीस आणि सुधाकर आव्हाड.

कलानिकेतन उभारणार
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातील कोथरूड परिसरात ‘कोथरूड सांस्कृतिक कलानिकेतन’ उभारण्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. या परिसरात सांस्कृतिक उपक्रम नेहमी होत असतात. साहित्यिक, नाट्य, चित्रपट कलावंत, लेखक, नृत्यगुरू अशांची सर्वाधिक संख्या या परिसरात आहे. या केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच प्रशिक्षण देण्याची व्यवस्था असेल. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद महानगरपालिकेने केल्याची माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, अशी तरतूद करण्यात येत असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.

पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात खूप क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक शहर म्हणून ओळख मिळविण्यासाठी प्रयत्न हवेत. शहरातील प्रदूषण उद्योगांपेक्षा वाहनांमुळे अधिक आहे. त्यामुळे सक्षम सार्वजनिक वाहतूक, ग्रीन वाहन व्यवस्था करावी लागेल, तरच पुणे प्रदूषणमुक्त होईल, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोथरूडकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्या वेळी फडणवीस बोलत होते. खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, सत्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार, सुधाकर आव्हाड, आमदार सिद्धार्थ शिरोळे, रमेश बागवे, चंद्रकांत मोकाटे, जगदीश मुळीक, हेमंत रासने, अंकुश काकडे, मनसेचे बाबू वागस्कर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘पुण्यात झोपडपट्ट्या आहेत; पण एसआरए, केंद्राच्या योजनांचा उपयोग झाला नाही. आता प्रश्न सोडविणाऱ्यांनाच लोक स्वीकारतील.’’ मोहोळ म्हणाले, ‘‘हा प्रत्येक कोथरूडकराचा सत्कार आहे.’’ बापट, सुतार, बागवे, वागस्कर यांचीही भाषणे झाली.

पुणे : हिंजवडीतील कंपनीला भीषण आग

कोट्या अन्‌ कोपरखळ्या
सर्व पक्षांचे नेते असल्याने राजकीय कोपरखळ्यांनी रंगत आली. काकडे  म्हणाले, ‘चंद्रकांतदादा आमदारकीला उभे राहिले नसते, तर मोहोळ यांचा महापौर म्हणून सत्कार झाला नसता,’ यावर फडणवीस यांनी, पुण्याच्या कोणत्याच काकड्यांवर कुणाचा अंकुश चालू शकत नाही. कारण, एक आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मला खात्री आहे, अशी कोपरखळी मारली.