वडगाव मावळ येथे गरजूंना जेवणाच्या डब्यांसह किराणा साहित्याचे वाटप

वडगाव मावळ येथे गरजूंना जेवणाच्या डब्यांसह किराणा साहित्याचे वाटप
Updated on

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात हातावर पोट असलेल्या बऱ्याच नागरिकांचे लाॅकडाऊनमुळे जेवणावाचून हाल होत आहेत. अशा नागरिकांना बजरंग दलाने जेवणाचे डबे व किराणा साहित्याचे किट वाटप करून मदतीचा हात दिला आहे. तालुक्यात विविध ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहेत. तेथे परजिल्ह्यातील व परराज्यातील कामगारांची संख्या मोठी आहे. लाॅकडाऊनमुळे हे सर्व कामगार अडकून पडले आहेत. ऊसतोड कामगारही निराधार झाले आहेत.

बजरंग दलाने अशा सर्व निराधार नागरिकांची माहिती घेऊन त्यांना दुपारचे जेवण व गरजेप्रमाणे तांदूळ, गहू, साखर, तेल, तुरडाळ, मीठ, मसाला, चहापावडर, बिस्किटे इत्यादी साहित्याचे किट वाटप केले जात आहे.

तालुक्यातील देहुरोङ येथे ७५०, तळेगाव दाभाडे १०००, तळेगाव स्टेशन ३००, वङगाव २००, कान्हेफाटा ३००, टाकवे बुद्रुक ३५०, नवलाख उंब्रे १५०, उर्से  १२०, सोमाटणे येथे ८० पॅकेट जेवन असे सर्व मिळून रोज ३ हजार ३०० लोकांना जेवण पुरविले जाते. या उपक्रमासाठी ईस्काॅन, श्री जैन टेंपल ट्रस्ट, देहुरोड व समाजातील दानशुर लोकांकङुन मदत केली जाते.

पोलिस बांधव चोविस तास आपला जीव धोक्यात घालून समाजात जागृती करत आहेत. अशा कर्तव्यदक्ष पोलीसांसाठी रोज जेवण, पोलिस स्टेशन मध्ये सॅनिटायझर फवारणी करुन निर्जंतुकीकरण करणे, पोलिस बांधवांबरोबर रस्त्यावर गस्त घालणे इत्यादी कामेही केली जात आहेत. 

आतापर्यंत ५६२ कोरडा शिधा किट वाटप करण्यात आले आहे. २३० कीट बनवून वाटपासाठी तयार आहेत. समाजातील दानशुरांनी या सेवा कार्यात यथाशक्ती आर्थिक, धान्य स्वरुपात मदत करुन समाजाप्रती आपले असलेले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com