Vidhan Sabha 2019 : सिध्दार्थ शिरोळेंच्या प्रचारार्थ नीलम गोऱ्हे, संजय काकडे मैदानात 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असताना, आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पुणे शहरातील वरिष्ठ कामाला लागले असून आज रविवारचा योग साधत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार संजय काकडे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. 

आज ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी, पांडवनगर, दीप बंगला चौक या ठिकाणाहून नीलम गोऱ्हे यांची शिरोळे यांच्या प्रचारासाठी प्रचार यात्रा झाली. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले पुणे शहराचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आनंद मांजाळकर, ज्योत्स्ना एकबोटे,  स्वाती लोखंडे, सागर धोत्रे, नीता मंजाळकर, अपर्णा कुऱ्हाडे, दत्ता घोगलू, राजेश धोत्रे, राम म्हेत्रे, किरण ओरसे आदी या वेळी उपस्थित होते.

यावेळी गोऱ्हे यांनी शिरोळे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शिवाजीनगर मतदार संघातील मतदारदारांना केले. यानंतर खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली जय जवान नगर नाईक वस्ती येथे बंजारा समाजाच्या तरुणांचा मेळावा देखील घेण्यात आला. यावेळी शिरोळे यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधला.

आज सकाळी सिध्दार्थ शिरोळे यांनी खडकी आणि संगमवाडी येथील दोन गुरुद्वारांना भेट देत आशीर्वाद घेतले. त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली येथे शिरोळे यांनी सामान्य मतदारांशी संवाद साधला. शिवाजी चव्हाण, जितू मंडोरा, प्रवीण शेळके, दत्ता खंडाळे आदी यावेळी उपस्थित होते. जनवाडी पाच पांडव भागातील कोकणी रहिवासी नागरिकांनी शिरोळे यांना आपला पाठींबा जाहीर केला. त्यावेळी संपूर्ण मतदार संघातून कोकणी लोक उपस्थित होते. याबरोबरच खडकी येथील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक देखील पार पडली. यावेळी उपस्थित सर्व प्रमुखांशी शिरोळे यांनी संवाद साधला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neelam Gorhe and Sanjay Kakade is supporting Siddharth Shirole for Maharashtra Vidhan sabha 2019