सोशल मिडियांवरील धमक्‍यांना कायद्याच्या कक्षेत आणू - डॉ. गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

सामाजिक माध्यमांतील धमक्‍यांना कायद्याच्या कक्षेत आणून, त्यावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सायबर क्राईम तज्ज्ञ आणि अधिकारी यांची खास बैठक बोलावणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी (ता.12) पुण्यात बोलताना सांगितले.

पुणे : फेसबुक, ट्विटर यासारख्या सामाजिक माध्यमांमध्ये ट्रोल करताना समाजातील अनेक तज्ज्ञ, राजकारणी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना जिवे मारण्याच्या धमक्‍या देणे, महिलांना थेट बलात्कार करण्याची धमकी देणे, यासारखे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. ही समाजाच्यादृष्टीने बाब चिंताजनक आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांतील धमक्‍यांना कायद्याच्या कक्षेत आणून, त्यावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सायबर क्राईम तज्ज्ञ आणि अधिकारी यांची खास बैठक बोलावणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी (ता.12) पुण्यात बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्याला सोशल मिडियाचा वाढता वापर आणि ट्रोल करण्याच्या बाबी जबाबदार आहेत. आतापर्यंत नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. लंकेश यांना तर त्यांच्या मृत्यूनंतरही ट्रोल करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सोशल मिडियांवरील धमक्‍यांना कायद्याच्या कचाट्यात आणून, त्यावर कडक कारवाई होण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे : रिक्षा व टेंपोची धडकेत तिघांचा मृत्यू; मृतांत युवतीसह आजीनातवाचा समावेश

गोऱ्हे म्हणाल्या, "या माध्यमांवरील धमक्‍यादायक प्रतिक्रियांवर कायदेशीर कारवाई झाल्यानंतर, अशा प्रकारांना आळा बसू शकेल. दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पुणे शहरातही सायबर क्राईम आणि डिजिटल लिटरसी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neelam Gorhe speak About Cyber Crime in Pune