

माझ्या गावचा महादेव ( काल पान ३ वर लोगो आहे तो घ्यावा)
PGR26B03712
श्रीक्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर,पिंड व शिवमूर्ती.
निसर्गरम्य परिसरातील स्वयंभू नीलकंठेश्वर
पांगरी, ता. १४ : पांगरीपासून दोन किलोमीटर अंतरावर अन् चिंचोली गावाजवळचे श्रीक्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तसेच इतर दिवशीही पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. चिंचोली, पांगरी, पांढरी, ढेंबरेवाडी, घोळवेवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
- श्रावणातील भक्तिमय वातावरण : श्रावणातील सोमवारी महिला भजनी मंडळांकडून भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
- हेमाडपंथी बांधकाम : बालाघाटच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे मंदिर चिंचोली गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. हेमाडपंथी शैलीतील राजस्थानी कलाकारांच्या माध्यमातून अखंड दगडांमध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. दगडी बांधकामातील सुबक कलाकुसर हे मंदिराचे विशेष आकर्षण आहे. मंदिरासमोर प्रशस्त सभामंडप असून, श्रावण महिन्यात महिला भाविकांकडून येथे पूजा-अर्चा केली जाते.
- प्रभू रामचंद्रांनी केली पूजा : पूर्वी हा परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. प्रभू रामचंद्र सीतामाईच्या शोधार्थ दंडकारण्यात दाखल झाले असता त्यांना शिवलिंगाची पूजा करण्याची इच्छा झाली. त्यावेळी जमिनीतून शिवलिंग प्रगट झाले अन् प्रभू रामचंद्रांनी त्याची पूजा केली. तेव्हापासून हे स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
- नदी, डोंगर अन् हिरवाई : मंदिराची नित्य पूजा-अर्चा, स्वच्छता अन् देखभाल दत्ता गुरव, गणेश गुरव, नीलेश गुरव, प्रितम गुरव मंडळींकडून केली जाते. मंदिराजवळून नीलकंठ नदी वाहते. बांधण्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्यावर मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
चौकट
कसे जाल...
सोलापूर ते नीलकंठेश्वर मंदिर : वैराग-पांगरी मार्गे सुमारे ७७ कि.मी.
बार्शी ते नीलकंठेश्वर मंदिर : सुमारे २२ कि.मी.
येडशी अभयारण्य ते नीलकंठेश्वर मंदिर : सुमारे ८ कि.मी.
धाराशिव ते नीलकंठेश्वर मंदिर : सुमारे २५ कि.मी.
येरमाळा येडेश्वरी मंदिर ते नीलकंठेश्वर मंदिर : पांगरी मार्गे सुमारे ११ कि.मी.
वैराग ते नीलकंठेश्वर मंदिर : मळेगाव-चिखर्डे मार्गे सुमारे ३२ कि.मी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.