

Neera River Water Release Meeting and Protest Updat
esakal
नीरा नरसिंहपूर : नीरा नदीमध्ये नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी व चाऱ्यासाठी पाणी सोडण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनद्वारे आंदोलनकर्त्यांशी बोलताना दिल्याने सराटी (ता. इंदापूर) येथील रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले.