

दोन वर्षे मी ‘नीट’ची तयारी करत होतो. दररोज नऊ ते १० तास अभ्यास करून या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली. परीक्षा दिल्यानंतर मला ७२० पैकी ६३९ गुण मिळाले आणि त्यामुळे आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो. मात्र, पेपरफुटीच्या घटनेमुळे आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याचे समजल्याने मोठा मानसिक धक्का बसला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नीट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा गंभीरपणे विचार व्हावा.
- विहान अरगडे, विद्यार्थी (फोटो----18923)
दरवर्षी पेपरफुटी कशी होते, हा मोठा प्रश्न आहे. त्याहूनही दुर्दैवी म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एवढ्या गंभीर विषयाची माहिती केवळ एका ट्विटद्वारे दिली. विद्यार्थ्यांची माफी मागितली नाही, पालकांना विश्वासात घेतले नाही. हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे. पुन्हा सुरुवातीपासून तयारी करणे मानसिकदृष्ट्या खूप कठीण आहे. आमचा वेळ, आमचे वर्ष आणि आमचे भविष्य या सगळ्यांशी खेळ केला जात आहे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
- सुहानी गुप्ता, विद्यार्थीनी (फोटो---------18940)
‘नीट’सारखी परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जात असल्याने अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता कायम राहते. याउलट, ‘एनटीए’तर्फे घेतल्या जाणाऱ्या संगणकाधारित परीक्षांमध्ये पेपरफुटी किंवा गैरप्रकारांची शक्यता तुलनेने कमी असते. त्यामुळे भविष्यात ‘नीट’ संगणकावर घेण्याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
- शेषाद्री नाईक, संस्थापक अध्यक्ष, सिओपिअन्स अकॅडेमी (फोटो-------18921)
हा अडथळा करिअरच्या प्रवासाला पूर्णविराम देणारा नाही. विद्यार्थ्यांनी या काळात आंतरराष्ट्रीय आरोग्य शिक्षणाच्या संधींचा विचार करावा किंवा वेगाने वाढणाऱ्या पूरक वैद्यकीय विज्ञान आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील करिअरचे पर्याय गांभीर्याने समजून घ्यावेत. भारतात आणि जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. उद्योगविश्व आणि आरोग्य क्षेत्राची व्यापक माहिती करून घेणारे विद्यार्थी भविष्यात अधिक सक्षमपणे पुढे जातील.
- कॅडविन पिल्लई, व्यवस्थापकीय संचालक, ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअर (फोटो------18922)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.