सोमेश्वरनगर - बारामती येथील सिद्धी मंजाबापू बढे या प्राथमिक शिक्षकाच्या मुलीने 'नीट' परीक्षेत तब्बल 665 गुण मिळवीत मुलींमधून संपूर्ण देशात तिसरा तर मुलींमधूनच राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. असा पराक्रम करणारी ती बारामती तालुक्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.