मंचर - साध्या सलून व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलगा यश किरण क्षीरसागर याने आपल्या जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने डॉक्टर होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. सामाजिक परिस्थितीच्या मर्यादा झुगारून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या यशच्या या यशस्वी प्रवासामुळे मंचर परिसरात कौतुक केले जात आहे.