पुणे - झोपडपट्ट्या आणि वस्तीतील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ‘आपला दवाखाना’ योजना महापालिका आणि राज्य शासनाच्या मतभेदांमुळे अंमलबजावणीपूर्वीच अडकली आहे. दोन वर्षांत ५८ पैकी फक्त ११ ठिकाणीच दवाखाने सुरू झाले असून, उर्वरित केंद्रे कागदावरच मर्यादित राहिली आहेत.