
सौरभ ढमाले
पुणे : शहराला इतिहासाची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र, या परंपरेचे जतन करण्याऐवजी अनेक ठिकाणी त्याकडे गंभीर दुर्लक्ष होताना दिसते. याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळील श्रीमंत बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांची समाधी. मराठा साम्राज्याच्या वैभवाचा कळस पाहणाऱ्या या महान पेशव्यांची समाधी आज कचऱ्याने वेढली आहे.