
कर्वेनगर : वारजे परिसरातील रस्त्यावर गेल्या पाच वर्षांत पदपथावर अनेक वाचनालय उभारण्यात आली होती. त्याचा फायदा नागरिकांना काही प्रमाणात होत होता. विविध वृत्तपत्रे, मासिके नागरिक वाचत होती. मात्र, गेल्या तीन चार वर्षांत ही वाचनालये देखरेखअभावी धूळ खात पडून आहेत. सार्वजनिक पैशातून उभारलेली ही वाचनालये आज केवळ नावापुरती उरली असून, याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.