Pune News : वारज्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची दुरवस्था, कोट्यवधींचा खर्च पाण्यात; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Warje Stadium : वारजेतील शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमवर ७ कोटी खर्च करूनही ते धूळ खात असून, निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Warje Stadium
Warje StadiumSakal
Updated on

वारजे : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकादमीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम धूळ खात पडून आहे. ७ कोटी रुपये खर्चूनही त्याची दुरवस्था पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली, ज्यामुळे एकूण खर्च ९ कोटींवर पोहोचणार आहे. स्टेडियमची सद्यःस्थिती पाहता हा पैसा पाण्यातच जाणार असणार असे चित्र आहे. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, येथील स्टेडियमची कामे करण्यात आलेली आहेत. पुढील काळातही बजेटनुसार येथील कामे केली जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com