
पुणे : पुणे महापालिकेच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा स्वच्छतागृहाच्या टाकीत बुडून मृत्यू झाला, असा ठपका ठेवत त्याच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दिवाणी न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी यांनी हा निकाल दिला.