Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

बालआरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या कामकाजात गंभीर दुर्लक्ष व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पुण्यातील आरोग्‍य विभागाच्‍या कुटुंब कल्याण कार्यालयाच्‍या दोन सहाय्यक संचालकांना निलंबित करण्यात आले आहे.
health department Two Assistant Directors suspended

health department Two Assistant Directors suspended

sakal

Updated on: 

पुणे - बालआरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या कामकाजात गंभीर दुर्लक्ष व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पुण्यातील आरोग्‍य विभागाच्‍या कुटुंब कल्याण कार्यालयाच्‍या दोन सहाय्यक संचालकांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. राजकुमार जगताप आणि डॉ. राजश्री गजानन ढवळे यांना निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत. अनेक दिवसांनंतर निलंबनाची कारवाई झाल्‍याने या विभागात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com