Plane Company : विमान कंपन्यांचा निष्काळजीपणा! दोन अपघातांनंतरही टर्मिनलपर्यंत प्रवाशांचा धोकादायक ‘प्रवास’

ग्राउंड स्टाफच्या चुकीमुळे पुणे विमानतळावर १५ दिवसांपुर्वी दोन विमानांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अशातच विमान कंपन्यांचा निष्काळजीपणा आला समोर.
Plane Company
Plane Companysakal

- प्रसाद कानडे

पुणे - ग्राउंड स्टाफच्या चुकीमुळे पुणे विमानतळावर १५ दिवसांपुर्वी दोन विमानांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अशातच विमान कंपन्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलमध्ये जाण्यासाठी एरोब्रिज व लॅडरची व्यवस्था असतानाही अनेकदा प्रवाशांना पार्किंग बे पासून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागते. विमानतळाच्या एअर साइडवर सातत्याने विविध वाहनांची वाहतूक होत असते. यातून प्रवाशांना चालत जावे लागणे म्हणजे अपघाताला आमंत्रण आहे.

विमानतळावर दाखल होणाऱ्या विमानांच्या प्रवाशांना ‘आगमन’ गेटवर जाण्यासाठी बऱ्याचदा एरोब्रिज व लॅडरची व्यवस्था केलेली असते. मात्र काही वेळा एअरलाईन्स या दोन्हींचा वापर न करता प्रवाशांना धावपट्टी जवळच्या ‘पार्किंग बे’ येथे उतरवितात.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राउंड स्टाफची कामे सुरू असतात. या निमित्ताने वाहनांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना धोकादायकरीत्या ‘पार्किंग बे’ ते टर्मिनल असा प्रवास करावा लागत आहे.

दोन विमानांचा अपघात झाल्यानंतरही प्रवाशांची धोकादायक पद्धतीने पायपीट सुरूच आहे.

दोन्ही अपघातांत ग्राउंड स्टाफची चूक असल्याचे निदर्शनास आले. विमानतळ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला खरा, मात्र त्यामुळे प्रवासी सुरक्षेवर निर्माण झालेले प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत. विमानतळाच्या एअर साइडवरून चालत जाणे धोकादायक आहे. थांबलेले विमान, ग्राउंड स्टाफ वापरत असलेली वाहने, अशात प्रतिकूल वातावरण असेल तर प्रवासी टर्मिनलमध्ये चालत जाण्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

ग्राउंड स्टाफकडून या वाहनांचा वापर

- बॅगेज ट्रॅक्टर, बॅगेज ट्रॉली, कार्गो ट्रॉली, पुश बॅक टग, लॅडर, फ्युएल बॉवसर आदी वाहनांचा विमानतळावर २४ तास वापर होतो.

पुणे विमानतळावर पुरेशा प्रमाणात एरोब्रिज व लॅडर आहेत. त्यामुळे प्रवाशांना चालत टर्मिनल गेटवर जावे लागत नाही. कधी असे झाले तरीही योग्य ती काळजी घेण्यात आलेली असते.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

प्रवाशांना‘पार्किंग बे’वर उतरविल्यास तेथे बसची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. मात्र टर्मिनलपर्यंत पायपीट करीत जाणे चुकीचे आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात काहीवेळा प्रवाशांना छत्री दिली जाते. छत्री उडून गेल्यानंतर प्रवाशांची तारांबळ उडतेच, शिवाय त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. तेव्हा प्रवाशांना चालावे लागू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्‌ज्ञ.

चालत जाणे धोकादायक का?

  • विमानतळाचा एअर साइड भाग अत्यंत संवेदनशील मनाला जातो. ‘पार्किंग बे’ ते धावपट्टीपर्यंत चालणारी कामे येथेच केली जातात. ट्रॅक्टरपासून पुश बॅक टगपर्यंत सर्व वाहनांचा येथे वावर असतो.

  • एअरलाइनचा अनेकदा ग्राउंड स्टाफवर वेळेत कामे करण्यासाठीचा दबाव असतो. त्यामुळे ग्राउंड स्टाफ अनेकदा नियमांचे उल्लंघन करीत ही कामे करतात.

  • एअर साइडवर येऊ नये अशा जागेतही ग्राउंड स्टाफ येतात.

  • कामे उरकण्याच्या नादात ते अनेकदा वेगाने वाहन चालवितात. प्रवासी चालत जात असतील तर अपघाताचा धोका संभवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com