Wagholi Accident : अचानक ट्रक वळवल्याने अपघातात मोटारचालकाचा मृत्यू
TruckAccident : वाघोलीतील गाडेवस्ती चौकात ट्रकचालकाने अचानक वळण घेतल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारचालकाचा मृत्यू झाला असून, ट्रकचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : ट्रकचालकाने निष्काळजीपणाने अचानक ट्रक वळवल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारचालकाचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावर वाघोलीतील गाडेवस्ती चौकात शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.