पावसाच्या पाण्यात तरंगली हडपसरची नेहरू मंडई

दुरूस्तीकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Pune
PuneSakal

हडपसर : सखल असल्यामुळे चारही बाजूने जमा होणारे पाणी व पावसाळी वाहिनीची दुरवस्था यामुळे येथील पंडीत जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) मंडईत मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने येथील भाजीपाला विक्रेत्यांसह इतर व्यवसायिकांचेही (Business) मोठे नुकसान झाले आहे. वारंवार मागणी करूनही येथील दुरूस्तीकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

चारही बाजूने झालेल्या रस्ते विकासामुळे या मंडईचा संपूर्ण परिसर सखल झालेला आहे. यामुळे मंडईत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर जमा होत असते. आतील पावसाळी वाहिन्या सक्षम नसल्याने हे पाणी साठून राहत आहे. येथे असलेले चेंबर तुटलेले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचा कचरा अडकून राहत आहे, काही चेंबरच्या जाळ्या तुटल्याने त्यावर बारदाने टाकण्यात आली आहेत, यामुळे पाण्याला अडथळा होऊन ते साचून राहत आहे.

सध्या होत असलेल्या पावसाने वारंवार पाणी साचून राहत आहे. त्यामध्ये भाजीपाला भिजून खराब होत आहे. वाहून जात आहे. पाण्यामुळे ग्राहकही मंडईत येत नाहीत. पाण्याचा निचरा झाल्यावरही येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असते. या चिखलातून चालताना ग्राहकांना कसरत करीत चालावे लागते. येथील पार्किंग शेडचीही दुरवस्था झालेली आहे. शेडमध्ये नियमित पाणी साठलेले असते. अनेक नागरिक त्या जागेचा लघुशंकेसाठीही वापर करतात. सततच्या या परिस्थितीमुळे येथे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Pune
ओबीसी आरक्षण : निवडणुका पुढे ढकलाव्या याबाबत एकमत - वडेट्टीवार

दयानंद राऊत, संतोष होले, चंद्रकांत टिळेकर, मयूर फडतरे, रामदास लोखंडेसह काही भाजी विक्रेत्यांनी याबाबत पालिकेच्या मंडई मुकादमाकडे तक्रार केली आहे. तातडीने पावसाळी जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेचे उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनीही यापूर्वी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे नवीन जलवाहिनी व इतर सुविधा पुरविण्याची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com