नेहरू वसतिगृहाची दुरवस्था; विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवणार का

नेहरू वसतिगृहाची दुरवस्था; विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवणार का
Published on

नेहरू वसतिगृहात विद्यार्थी सुविधांपासून वंचित

जि. प. प्रशासनाला १५ दिवसांची मुदत; विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : ग्रामीण भागातून सोलापूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या नेहरू विद्यार्थी वसतिगृहाची दुरवस्था समोर आली आहे. अस्वच्छ स्वच्छतागृहे, दुर्गंधी, खोल्यांना दरवाजे-खिडक्यांचा अभाव, तुटलेल्या विद्युत फिटिंग्ज, पंख्यांची कमतरता तसेच कॉट, गादी, टेबल, खुर्ची व कपाटासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केला आहे.
वसतिगृहातील स्वच्छतेचा प्रश्न वृत्तपत्रातून समोर आल्यानंतर शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २० सप्टेंबर रोजी वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी अधीक्षक, लिपिक व स्वच्छता कर्मचारी उपस्थित नसल्याचे संघटनेने सांगितले. पाहणीत यंदा दाखल झालेल्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना अपुऱ्या सुविधांमध्ये राहावे लागत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. काही विद्यार्थी फरशीवर सतरंजी अंथरून अभ्यास करत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत मागण्या पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी दिला. ‘अधिकाऱ्यांनी एक दिवस वसतिगृहात मुक्काम करून प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवावी,’ असे आव्हानही त्यांनी दिले.

दहा मागण्यांचे निवेदन
प्रत्येक दोन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खोली, सुरक्षित दरवाजे-खिडक्या, रंगकाम, पंखे व ट्यूबलाइट, प्रत्येक विद्यार्थ्यास कॉट-गादी, टेबल-खुर्ची व कपाट, स्वच्छ शौचालये, स्नानगृहात शॉवर, वॉटरप्रूफ दरवाजे आणि २४ तास फिल्टर केलेल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाण्याची नियमित टीडीएस तपासणी करून नोंद ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com