NEP-2020Sakal
पुणे
NEP-2020 : आता हवा तेव्हा प्रवेश, हवे तेव्हा शिक्षण; नवीन योजनेला हिरवा कंदील
Higher Education : यूजीसीच्या ‘मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिट’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, आता विद्यार्थ्यांना शिक्षणात लवचिकता मिळणार आहे.
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट योजनेमुळे आता विद्यार्थी शिक्षणात हवा तेव्हा प्रवेश घेऊन शिक्षण सुरू करू शकतील आणि गरज असल्यास शिक्षणात तात्पुरता विराम घेऊन काही वर्षांनी पुन्हा त्याच टप्प्यावरून शिक्षणाला सुरुवात करू शकतील. अशा या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता आयोगाने मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जाहीर केला आहे.