'' एनईपी '' मध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राची आवश्यकता . '' प्रा . डॉ .विष्णू वाघमारे

'' एनईपी ''  मध्ये आपल्याला  पुढे जाण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राची आवश्यकता . '' प्रा . डॉ .विष्णू वाघमारे
Published on

VRG26B06273
वैराग (ता. बार्शी) : येथे गांधी महाविद्यालय व अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
एनईपी समजून घेण्यासाठी कार्यशाळांची गरज
डॉ. विष्णू वाघमारे; वैराग येथे ‘भारतीय इंग्रजी साहित्य’वर राष्ट्रीय चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. ५ : नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) सध्या देशभरात लागू करण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना अनेक आव्हाने समोर येत आहेत. त्यामुळे या धोरणाचे स्वरूप समजून घेण्यासाठी व त्यानुसार पुढे जाण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची गरज असल्याचे मत इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विष्णू वाघमारे यांनी व्यक्त केले.
सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय, वैराग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय इंग्रजी साहित्य’ विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी बी.ए. भाग दोनच्या इतिहास विषय अभ्यासक्रमावरील कार्यशाळेचे उद्‌घाटन प्रा. डॉ. विष्णू वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शकील शेख होते.

यावेळी प्राचार्य डॉ. शेख म्हणाले की, भारतीय साहित्याने जगाला दिलेले योगदान अत्यंत व्यापक, गहन आणि मानवतावादी आहे. भारतीय साहित्याने जगाला अध्यात्म, नैतिकता, तत्त्वज्ञान, कुटुंबव्यवस्था, सत्य, धर्म, कर्तव्य, करुणा आणि सहिष्णुतेची मूल्ये दिली आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार पुकाळे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रामराजे मोटे यांनी केले, तर आभार प्रा. मकरंद भुजबळ यांनी मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्रासह इतर राज्यांतील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. देविदास शिंदे, डॉ. अप्पासाहेब बिरुनके, अनिल शेटे, प्रकाश लोखंडे यांच्यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com