

nepal flood
esakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - नेपाळमधील भीषण पूर आणि भूस्खलनाच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या राज्यातील ६० नागरिकांचा अद्याप शोध सुरू आहे. दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या पुण्यातील नऊ नागरिकांपैकी आठ जण पूर्णपणे सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले असून, ते प्रशासनाच्या संपर्कात आहेत. मात्र, राहाटणी येथील एक नागरिक अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत घेतली जात आहे.