Sakal Relief Fund
sakal
पुणे - महाराष्ट्रात आणि देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून ‘सकाळ रिलीफ फंड’ सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य सातत्याने करत आहे. आपतग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत देवभूमी नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता व पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.