
पुणेः नेपाळमध्ये सध्या मंगळवारच्या तुलनेत परिस्थिती थोडी सुधारली आहे. सैन्याने ताबा घेतल्यापासून या ठिकाणी काहीशी शांतता आहे. नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. मात्र, अद्यापही जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. तसेच विमानसेवा देखील सुरू नाही. त्यामुळे आम्ही कधी परत स्वदेशी येऊ याची आस लागली आहे, अशी भावना नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक प्रसाद पाठक यांनी व्यक्त केली.