
Nepal Protest
Sakal
पुणे : ‘नेपाळमधील २६ समाजमाध्यमे बंद केली, ते जेन-झीची कल्पकता, आक्रोश व्यक्त होण्याचे माध्यम होते. याचा असंतोष व्यक्त करण्यासाठी जेन-झी रस्त्यावर उतरले होते. शांततापूर्ण सुरू असलेल्या आंदोलनातील सहभागी युवकांना गोळीबार करण्यात आला. त्यात काहींचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये झालेल्या जेन-झींच्या आंदोलनाला तेथील विकेंद्रित आणि भ्रष्टाचार महत्त्वाचे कारण आहे,’ असे प्रतिपादन नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार युवराज घिमिरे यांनी मंगळवारी केले.