नेर येथे तित्तर पक्ष्याची शिकार करण्याचा प्रयत्न; वनविभागाची कारवाई जिवंत तित्तर पक्षी नैसर्गिक अधिवासात मुक्त; दुचाकीसह फासे जप्त

नेर येथे तित्तर पक्ष्याची शिकार करण्याचा प्रयत्न; वनविभागाची कारवाई  जिवंत तित्तर पक्षी नैसर्गिक अधिवासात मुक्त; दुचाकीसह फासे जप्त
Published on: 

नेर येथे तित्तर पक्ष्याची शिकार करण्याचा प्रयत्न

वनविभागाची कारवाई; जिवंत तित्तर पक्षी, दुचाकीसह फासे जप्त

पुसेगाव, ता. ३ : वडूज वनपरिक्षेत्रातील नेर-ललगुण रस्त्यालगत नेर हद्दीत तित्तर पक्ष्याची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर वनविभागाने कारवाई केली. या कारवाईत जिवंत तित्तर (ग्रे फ्रँकोलिन) पक्षी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे दोन फासे आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेर परिसरात शिकार सुरू असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनपाल राजाराम काशीद आणि वनरक्षक गौतम सोनकांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जिवंत तित्तर पक्षी, दोन फासे आणि दुचाकी (एमएच ४२ बीए ८२४८) आढळून आली. वनकर्मचारी येत असल्याचे लक्षात येताच संशयित अनिल लत्या काळे (रा. वर्धनगड) हा घटनास्थळावरून पसार झाला.
वनविभागाने जिवंत तित्तर पक्षी सुस्थितीत असल्याची खात्री करून त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या प्रकरणी अनिल काळे याच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर करीत आहेत. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक गौतम सोनकांबळे, संतोष काळे आणि माने यांनी केली. वडूज वनपरिक्षेत्रातील नागरिकांनी वन्यप्राण्यांची शिकार, अवैध वृक्षतोड, तसेच राखीव वनक्षेत्रातील अतिक्रमणासारख्या घटनांची माहिती वनविभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com