Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

‘पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने यावर्षी जिल्ह्यात ६६२ किलोमीटर नवीन रस्त्यांचे मजबुतीकरण, तर काही रस्ते नव्याने केले जाणार आहेत.
pune grand tour 2026

pune grand tour 2026

sakal

Updated on

पुणे - ‘पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने यावर्षी जिल्ह्यात ६६२ किलोमीटर नवीन रस्त्यांचे मजबुतीकरण, तर काही रस्ते नव्याने केले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, डीपीसी यांच्या माध्यमातून सुमारे ९०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या रस्त्यांमुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल,’ असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com