माळेगाव - बारामतीच्या बदलत्या वैभवात आता मेडद येथील नवीन आयुर्वेद महाविद्यालय इमारतींची भर पडत चालली आहे. शासनस्तरावर सुमारे ३५० कोटींपेक्षा अधिक खर्च होणाऱ्या निधीतून वरील आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रकल्प पुर्णत्वास येऊ पाहत आहे..या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पहाणी आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यापुढे स्वार्थाने स्मार्ट शहर म्हणून बारामतीकडे पाहिले जाईल, अशी समाधानाची भावना यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांपुढे बोलून दाखविली.मेडद (ता. बारामती) येथे शासनस्तरावर सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या आयुर्वेद महाविद्यालय व केरळ राज्याच्या धर्तीवर तयार होत असलेल्या युनिटची पाहणी आज अजित पवार यांनी केली. या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे..पवार यांच्या या भेटीत इमारत रंगरंगोटी बाबत, तसेच उर्वरित फर्निचर उभारणीचे निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतले गेले. दरम्यान, मेडद येथे २० जुलै २०२१ मध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्याल व संलग्न १०० रुग्ण खटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे.याकामी अजित पवार यांनी शासनस्तरावर दिलेले योगदान सध्याला प्रत्यक्षात उतरत आहे. हे महत्वाकांक्षी महाविद्यालयाचे कार्यक्षेत्र सुमारे ३० एकर आहे. त्यामध्ये मुख्य इमारत व इतर सेवासुविधा उभारण्यासाठी शासनस्तरावर सुमारे ३५० कोटी रुपये खर्च होत असल्याचे सांगण्यात आले..या भेटीमध्ये पवार यांना इमारतीचे रंगकाम, फर्निचर उभारणी आदी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अनिल काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार आदींनी दिली..आरोग्याविषयी सुविधा देणारे नवे केंद्र...प्रख्यात आयुर्वेदिक शास्त्राचे शिक्षण देणारे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय बारामतीमध्ये विकसित होत आहे. तालुकास्तरावरील हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. येथे प्राचीन भारतीय वैद्यकीय पद्धतीचे शिक्षण दिले जाईल आणि सोबतच सामान्य जनतेला प्रभावी आरोग्य सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.भविष्यात हा प्रकल्प उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारा आणि प्रभावी आरोग्यविषयक सुविधा देणारे केंद्र बनेल, असा विश्वास बारामतीचे अधिष्ठाता डाॅ. अनिल काळे यांनी व्यक्त केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.