जेऊर येथील नवभारत स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

जेऊर येथील नवभारत स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Published on

CKL26B02935
जेऊर (ता. करमाळा) : येथील नवभारत इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात गीत सादरीकरण करताना विद्यार्थी.
---
नवभारत स्कूलमध्ये रंगले
स्पंदन-२०२६ स्नेहसंमेलन
मुलांच्या नृत्य, नाट्य सादरीकरणाला दाद
सकाळ वृत्तसेवा
चिखलठाण, ता. ७ : जेऊर (ता. करमाळा) येथील नवभारत इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘स्पंदन-२०२६’ उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी जेऊर गावचे सरपंच पृथ्वीराज पाटील, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, डॉ. सुभाष सुराणा व विठ्ठल पाटील महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका दीपाली चिंचकर यांनी केले.
यावेळी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ व ‘पेरेंट्स ऑफ द इयर’ पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल पाटील महाराज व गणेश करे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावर्षी नव्याने सुरू होत असलेल्या आयटी विषयासंदर्भात ए.आय. क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. गोंधळीगीत, लावणी, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि देशभक्तिपर गीतांसह सादर झालेल्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तसेच विनोदी नाटक व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखाव्यालाही उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर, डॉ. शारदा सुराणा, हरिदास डांगे, दादासाहेब लबडे, वैभव बोराडे, महेश बोराडे, महादेव चौगुले, नागनाथ केकान, रोहित घोगरे यांच्यासह पालक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com