पुणे - ‘विल्सन’ या गंभीर आजारावर मात करत जिद्दीने आपली आवड जोपासणाऱ्या अक्षय परांजपे याची गोष्ट पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘अक्की : एक अक्षय्य इच्छाशक्ती’ हे पुस्तक सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित केले जात असून हे पुस्तक सहा जूनला सर्वत्र उपलब्ध होईल. या पुस्तकावर २५ टक्के प्रकाशनपूर्व सवलतही देण्यात येणार आहे.