
पुणे : इयत्ता पहिलीच्या ‘सीबीएसई पॅटर्न’वर आधारित नव्या पाठ्यपुस्तकांत कृती, खेळ आणि भाषेवर भर देत विद्यार्थ्यांना संकल्पना समजून सांगण्याला प्राधान्य दिले आहे. अभ्यासक्रमाच्या तिन्ही पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्थ्यांच्या जवळपास ६८ क्षमता विकसित होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.