IIIT : आयआयआयटीचे नवे संकुल नानोली गावात; नव्या अभ्यासक्रमांचाही समावेश

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणेचे (आयआयआयटी) नवे संकुल तळेगाव दाभाडे जवळील नानोली गावात उभारण्यात येत आहे.
IIIT Pune
IIIT Punesakal

पुणे - भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणेचे (आयआयआयटी) नवे संकुल तळेगाव दाभाडे जवळील नानोली गावात उभारण्यात येत आहे. जून २०२४ पासून १०० एकर जागेवर नव्या शैक्षणिक सुविधांसह अभ्यासक्रम सुरू होईल, अशी मागिती आयआयआयटी पुणेचे कुलसचिव एच.एन. साहू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणी संदर्भात आयआयआयटी पुणेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात साहू यांनी ही माहिती दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. रीतू तिवारी, विभाग प्रमुख चंद्रकांत गुळेद, डॉ. संदीप मिश्रा, डॉ. वैदुर्या जैन, डॉ. तन्मय हाझरा, डॉ. वागिशा मिश्रा, प्लेसमेंट ऑफिसर मुदित सचदेवा आदी उपस्थित होते.

नानोली येथील जागेवर सध्यस्थितीत शैक्षणिक इमारत, तीन वसतिगृहे, प्राध्यापकांसाठी क्वॉर्टरची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. या कॅम्पसद्वारे नव्या शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रम सुरू करण्यास मदत होणार आहे, असे साहू यांनी सांगितले. साहू म्हणाले,‘‘केंद्र सरकारचा नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा असलेले आयआयआयटी पुणे हे पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशिप तत्वावर (पीपीपी मॉडेल) २०१६ पासून सुरू करण्यात आले.

मात्र, कॅम्पससाठी स्वत:ची जागा नसल्याने, आतापर्यतचे शैक्षणिक वर्ग आणि प्रशासकीय कामकाज हे ट्रान्झिट कॅम्पसमधून सुरू आहे. आता कॅम्पसच्या उभारणीसाठी राज्य सरकारने नानोली गावातील १०० एकर स्वतंत्र जागा दिली असून, त्यावर कॅम्पसच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने १२८ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. हा निधी बांधकामाच्या टप्प्यानुसार मिळणार आहे.’

प्लेसमेंट वाढली -

आयआयआयटी पुणेतून कम्प्युटर सायन्स; तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग अशा दोन शाखांमध्ये पदवीचे शिक्षण दिले जाते. नुकत्याच संपलेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले आहेत. सर्वाधिर ५३ लाखाचे पॅकेज एका विद्यार्थ्यांला मिळाले असून, सरासरी पॅकेज हे १६ लाख रूपये आहे. गेल्या चार वर्षात प्लसमेंटमध्ये भरघोस वाढ झाल्याचे सचदेवा यांनी सांगितले.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षणासोबतच मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिटचा पर्याय राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शॉटटर्म क्रेडिट कोर्स शिकता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना आणि कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्टुडन्ट क्लबची स्थापना करण्यात आली आहे.

- डॉ. रीतू तिवारी, अधिष्ठाता, आयआयआयटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com