पुणे विद्यापीठातील नव्या अभ्यासक्रमांबाबत झाला मोठा निर्णय

पुणे विद्यापीठातील नव्या अभ्यासक्रमांबाबत झाला मोठा निर्णय

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यावर व्यवस्थापन परिषदेने नियंत्रण आणले आहे. नवे अभ्यासक्रम आर्थिक दृष्ट्या सक्षम असतील तरच त्यास मान्यता मिळेल. विद्यापीठ फंडातून त्यावर खर्च केला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाचा लौकिक मोठा असल्याने पदवीत्तर पदवी, संशोधनासह पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. हे अभ्यासक्रम विद्यापीठाचे असल्याने अतिशय कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येते, तसेच विद्यापीठात राहिल्यास इतर सुविधांचा लाभ मिळतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्राधान्य या असते. मात्र गेल्या काही काळामध्ये पदवी आणि पदविका यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत अाहे. अनेक अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये शिकवले जातात, तरीही विद्यापीठात सुरू करण्यात आले आहेत. 

हे लक्षात आल्याने व्यवस्थापन परिषदेत यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर जे नवे अभ्यासक्रम स्वयं अर्थसाह्य नसतील नसतील त्यांना परवानगी देऊ नये असा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. तसेच नव्याने सुरू होणार्या अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांना परडणारे असेल यावर लक्ष ठेवले जाईल. 

"विद्यापीठ पदवीत्तर पदवी आणि संशोधन यांना प्रोत्साहन देण्यासाठी असते, त्यामुळे अशाच अभ्यासक्रमांचा समावेश किती असला पाहिजे. जे अभ्यासक्रम आर्थिक दृष्ट्या सक्षम असतील त्यांनाच मान्यता द्यावी असा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला," असे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युनिक कोर्सला परवानगी 
जे पदविका, पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये शिकवले जात नसतील असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी विद्यापीठ तयार अाहे, अशां प्रस्तावांचे स्वागत असेल, असे पांडे यांनी सांगितले. 

विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदविकेचे शुल्क वेगळे आहे, त्याचा खर्चाचा तपशीलही वेगळा आहे. पण यावर नियंत्रण आवश्यक आहे. नवीन अभ्यासक्रमांना बंदी नसेल, पण हे अभ्यासक्रम सुरू करताना आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत का ? याची तपासणी केली जाईल.-प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यापीठात कमी शुल्कात चांगले शिक्षण मिळते, त्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेतात. पण सर्वच प्रकारचे शुल्क वाढविण्याचे विद्यापीठाचे धोरण दिसून येत आहे. इतर गोष्टींवरचा खर्च कमी करून विद्यार्थांच्या शिक्षणावर ही निधी खर्च झाला पाहिजे.  -एक विद्यार्थी, पुणे विद्यापीठ 

दृष्टीक्षेपात विद्यापीठ
विद्याशाखा -४ 
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम -८१ 
पदवी अभ्यासक्रम -१५
पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम  -६६ 
अभ्यासक्रमांसाठी तरतूद - ५५ कोटी

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com