
पुणे : देशाच्या विविध भूभागांमध्ये विमानतळ बांधणे कठीण आहे. तेथे हेलिकॉप्टर व छोट्या विमानांची सेवा फायदेशीर ठरते. येणाऱ्या काळात या सेवांचा विस्तार होणार असल्याने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र संचालनालय तयार केल्याची माहिती केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी दिली.