स. प. महाविद्यालयात शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

स. प. महाविद्यालयात या वर्षीपासून  महाविद्यालयीन डे बंद करण्यात आले आहेत. मात्र कॉलेजने नवीन उपक्रम सुरू केला आहे.

पुणे : स. प. महाविद्यालयात या वर्षीपासून  महाविद्यालयीन डे बंद करण्यात आले आहेत. मात्र कॉलेजने नवीन उपक्रम सुरू केला आहे.

कॉलेजमध्ये फक्त उर्मी या संस्कृतीक कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही पालखी सोहळा आज करण्यात आला. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

हातात फुल घेऊन लव यु म्हणण्यापेक्ष महाराजांचे चरित्र समजून सांगणं गरजेचं असल्याचं मत प्राचार्य यांनी व्यक्त केले. यांनी सांगितलं महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी पारंपरिक वेशात आले होते .कॉलेज कॅन्टीनपासून पालखी काढण्यात आली होती. इतर महाविद्यालयात असा उपक्रम सुरू होण गरजेचं आहे.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक उत्सवाचा शेवटचा दिवस असून महाविद्यालयाचे विद्यार्थी या सोहळ्याचे आयोजन करतात. मागील १५ वर्षाची परांपरा महाविद्यालयात सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New initiatives in college in sp college