
Pune : बाळाचे नवे रुप आणि आईला मिळालेल्या जीवदानाचा आनंद माळेगावकरांच्या गगणात मावेनासा
माळेगाव : गोरदर विवाहित मुलीचे मुळातच शरीर कमकुवत..हिमक्लोबीन कमी आणि त्यातच काविळ झाल्याने प्रस्तूतीपुर्वीच तिची धोकायदायक स्थिती निर्माण झाली, अशा प्रतिकूल स्थितीत बारामतीचे रुग्णमित्र अविनाश गोफणे व आश्वनी गोफणे या दांपत्यांनी पुण्यातील ससून हाॅस्पीटलच्या माध्यमातून प्रचंड वेदना सोसणाऱ्या संबंधित युवतीला वैद्यकिय मदत मिळवून दिली.
तब्बल २० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर डाॅक्टरांचे शर्थीचे प्रयत्न यशस्वी ठरले. प्रस्तूती तर नैसिर्गिक झालीच, शिवाय बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप संकाटातून बाहेर आले. अर्थात बाळाचे नवे रुप आणि प्रस्तूतीमधून मुलीला मिळालेल्या जीवदानाचा आनंद रुग्णांच्या कुटुंबियांबरोबरच माळेगावकरांच्या गगणात मावेनासा झाला. पायल स्वप्नील मदने (रा. माळेगाव खुर्द, ता.बारामती) हे संकटातून बाहेर आलेल्या २० वर्षीय मातेचे नाव आहे.
माळेगाव खुर्द येथील शेतमजूरी करणारे प्रकाश खोमणे यांची गरोदर मुलगी पायल ही बाळांतपणासाठी माहेरी (माळेगाव) आली होती. ९ मे रोजी मध्यरात्री पायल हिला पोटामध्ये प्रचंड वेतना होऊ लागल्या होत्या. शिरिरात तापही तितकाच फणफणत होता. पायलच्या वडीलांसह नातेवाईकांना रात्रीच्यावेळी काय करावे ते सुसत नव्हते.
पायचे चुलते गणेश खोमणे यांच्यासह काही युवकांनी रात्रीच्यावेळी घराशेजारील शेतकरी संग्राम काटे यांना घरी जावून उठविले व झालेली हकिगत त्यांना सांगितली. काटे यांनीही क्षणाचाही विलंब न करता रुग्णमिंत्र अविनाश गोफणे, आश्वनी गोफणे या दांपत्यांना रात्री दोन वाजता मोबाईलद्वारे संपर्क केला. तेथून खरी सूत्र हालली.
पेशंटला सुरवातीला बारामतीमधील काही हाॅस्पीलटमध्ये दाखल करण्याचा प्रय़त्न झाला, परंतु गरोदर पेशंटची प्रवृत्ती खूपच चिंताजन आढळून आली. बारामतीच्या संबंधित डाॅक्टरांनी सदरचे पशेंट तातडीने पुण्याला हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार गोफणे यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध केली आणि ते पेशंट पुण्यातील सरकारी ससून हाॅस्पीलमध्ये १० मे रोजी पहाटे तीन वाजता दाखल केले. तेथे पेशंट युवतीची आरोग्याची स्थिती पाहताच डाॅक्टरही चक्रावून गेले होते, परंतु डाॅक्टर मंडळींनी मनावर घेतल्यानंतर अशक्य गोष्ट शक्त होऊ शकते, असेच काहीसे तेथे घडले.
ससूनमधील प्रस्तूती विभागातील डाॅ.अक्षय यांच्या टिमने सुरवातीला पशेंट पालय़ हिला रक्ताचा पुरेसा पुरवठा सुरू केला आणि त्याचबरोबर काविळ कमी होण्याबाबत औषधोपचार सुरू केला. ताप व वेदना कमी करून शरिरात ताकद वाढविणे, पोटातील बाळाची तब्बेत ठिक ठेवणे आणि काविळाच्या आजाराची तिव्रता कमी करणे, अशा आव्हानात्मक व विविध टप्प्यांवर संबंधित डाॅक्टरांच्या टिमने शर्थिचे प्रय़त्न सुरू ठेवले.
१४ मे रोजी पालय हिची प्रस्तूती सुखरूप करण्यात ससून प्रशासनाला यश आले. प्रस्तूतीनंतरही संबंधित पायल पेशंटला रुग्णालय प्रशासनाने उत्तमपद्धतीचा आहार आणि औषोधोपचार सुरू ठेवला. २० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सध्याला पायल व तिचे बाळ या दोघांचीही तब्बत ठणठणित झाली आहे. डाॅक्टरांनी त्या दोघांनाही घरी सोडले. बाळाचे नवे रुप आणि प्रस्तूतीमधून आपल्या मुलीला (पायला) मिळालेल्या जीवदानाचा आनंद रुग्णाच्या कुटुंबियांना व गावकऱ्यांना गगणात मावेनासा झाला आहे.
देव तुमचे भल करले...
पुण्यात सूसून रुग्णालयात पालय मदने हिच्याबरोबर तिची आजी कूसूम हनुमंत चव्हाण सुरवातीपासून होत्या. मातेला व बाळाला घरी सोडताना त्या आजीबाईंच्या डोळ्यातील आश्रू आणि आनंदाला पारावार उरली नव्हती. देव तुमचे भले करो...असे आश्विर्वाद डाॅक्टरांपासून ते नर्सेसपर्यंत सर्वांना दिले.
आमचे ते कर्तव्यचं आहे....
रुग्णमित्र अविनाश गोफणे म्हणाले,`` ग्रामीण भागात आजूनही आरोग्याच्या समस्यांकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. शिक्षणाचा अभाव, उपचारासाठी लागणाऱ्या अर्थिक बाबीची समस्या आणि नातेवाईकांचे अज्ञान अशी अनेक कारणे त्यामध्ये दडलेली आहेत. तशीच काहीशी स्थिती पालय या मातेच्या बाबतीत होती.
परंतु डाॅक्टरांचे शर्थिचे प्रयत्न आणि आमचा मदतीचा हात मिळाल्याने पालय आणि तिचे बाळ सुखरूप घरी आले. अर्थात रुग्णांना मोफत व योग्यवेळी औषधोपचार, तसेच सेवासुविधा उपलब्ध करून देण्याकामी गेली २५ वर्ष मी व माझी पत्नी आश्वनी गोफणे मोफत काम करीत आहेत. रुग्णसेवा हे आमचे कर्तव्यच असल्याचे आम्हाला वाटते, असे मत रुग्णमित्र अविनाश गोफणे यांनी व्यक्त केले.