
पुणे : दहा किलोवॉटपेक्षा अधिक वीजवापर असणाऱ्या उद्योगांना सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेली वीज आठ तासच वापरण्याचे बंधन महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाच्या निर्णयामुळे आले आहेत. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये (पाळ्यांमध्ये) चालणाऱ्या उद्योगांच्या वीजबिलात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे.