ऑनलाइनचा नवा ‘फिटनेस फंडा’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

लॉकडाउनच्या काळात थांबलेल्या उत्पन्नास पुन्हा चालना देण्यासाठी ‘जिम ट्रेनर्स’ ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंगवर भर देत आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून फिटनेस ट्रेनिंग पुरविण्यात येत असून यामुळे कोरोना संसर्गाचा धोकाही टाळण्यास मदत मिळते व नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे, मत जिम चालक व ट्रेनर्स व्यक्त करत आहेत.

पुणे - लॉकडाउनच्या काळात थांबलेल्या उत्पन्नास पुन्हा चालना देण्यासाठी ‘जिम ट्रेनर्स’ ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंगवर भर देत आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून फिटनेस ट्रेनिंग पुरविण्यात येत असून यामुळे कोरोना संसर्गाचा धोकाही टाळण्यास मदत मिळते व नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे, मत जिम चालक व ट्रेनर्स व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत माहिती देताना पुणे फिटनेस क्‍लब असोसिएशनचे अध्यक्ष निलेश काळे म्हणाले,‘ लॉकडाउनच्या काळात जिम व्यवसाय सुद्धा बंद ठेवण्यात आल्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. अद्याप याबाबत कोणताच निर्णय शासनाकडून घेण्यात आला नाही. ऑनलाइन ट्रेनिंगमुळे थोड्या प्रमाणातच पण उत्पन्नास चालना मिळते आहे. तसेच झूम, वॉट्‌सॲप व्हिडिओ कॉल सारख्या माध्यमातून माध्यमातून जिम ट्रेनर्स आता घरूनच फिटनेससाठीचे व्यायाम तसेच ‘डायट’बाबत माहिती देत आहेत.’ व्यायाम शरीरासाठी चांगला असतो, परंतु तो योग्यरीत्या केला नाही तर त्याचा वाईट परिणाम पण होऊ शकतो. घरी राहूनच नागरिक फिटनेसचे धडे अमच्यामार्फत घेत आहेत, असे ‘मसल टाईम’ जिमचे फिटनेस ट्रेनर प्रशांत झुरांगे यांनी सांगितले.

असा होतोय फायदा

  • जिम बंद असल्या तरी ऑनलाईन माध्यमातून ट्रेनिंग
  • जिम उपकरणांऐवजी पर्यायी गोष्टींचा वापर
  • आर्थिक उत्पन्नास काही प्रमाणात चालना
  • संसर्गचा धोका नाहीच

प्रत्येक व्यक्तीच्या वजन, वय आणि शरीरानुसार व्यायामाचा सल्ला दिला जातो. हे व्यायाम किती मिनिटे करायचे हे अत्यंत महत्वाचे असल्याने ते समजून घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो हे देखील सविस्तरपणे सांगण्यात येत आहे. 
- आकाश लांघे, जिम ट्रेनर - जिमहोलिक फिटनेस अँड वेलनेस क्‍लब

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New online fitness funda