Ambegaon News : आंबेगावला मिळणार नवीन पिनकोड आणि टपाल कार्यालय

आंबेगावच्या दत्तनगर येथील असणारे टपाल कार्यालय कात्रज येथे स्थलांतरित झाले. स्थानिकांनी आंबेगाव बुद्रुक परिसरासाठी नवीन टपाल कार्यालय मिळावे यासाठी टपाल विभागाला अर्ज केले होते.
New PIN code and post office for Ambegaon
New PIN code and post office for Ambegaon Sakal
Updated on

आंबेगाव : आंबेगावच्या दत्तनगर येथील असणारे टपाल कार्यालय कात्रज येथे स्थलांतरित झाले. स्थानिकांनी आंबेगाव बुद्रुक परिसरासाठी नवीन टपाल कार्यालय मिळावे यासाठी टपाल विभागाला अर्ज केले होते.

शिवाय आंबेगाव परिसरातील वाढते नागरीकरण या बाबींचा विचार करून, टपाल विभागाकडून मागणीला सक्रिय प्रतिसाद देत आंबेगाव खुर्द, शनिनगर चौक येथील लेकव्हिस्टा सोसायटीच्या परिसरात नवीन कार्यालय कार्यरत होणार असल्याची माहिती टपाल विभागाकडून देण्यात आली.

भारतीय टपाल खात्याने आंबेगावला ४११०७३ हा नवीन पिनकोड दिला आहे.तर येत्या दोन महिन्यांत आंबेगाव खुर्द येथे नवीन टपाल कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती टपाल विभागाकडून देण्यात आली.

नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेला उपनगर परिसर झपाट्याने होतो आहे.त्यामुळे टपाल कार्यालयांची मागणी स्थानिकांकडून जोर धरत होती.ही मागणी लक्षात घेवून आणि नागरिकांना टपालाच्या सुविधा मिळण्यासाठी टपाल विभागाने नव्या उपनगरांत टपाल कार्यालयांचे जाळे विस्तारायला सुरुवात केली आहे.

आंबेगाव पाठोपाठ सहकारनगर आणि बावधन याठिकाणी टपाल कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.साधारण सहा महिन्याच्या कालावधीत ही तीनही कार्यालये कार्यरत होणार असल्याची माहिती टपाल सहायक अधीक्षक एस आर साबळे यांनी दिली.

आंबेगाव परिसरातील टपाल कार्यालयात केंद्राकडून मान्यता मिळाली आहे.शिवाय यासाठी लागणारी जागाही महापालिकेकडे उपलब्ध आहे. जागा मिळण्यासाठी आम्ही महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे.येत्या दोन महिन्यात आंबेगाव येथील टपाल कार्यालय सुरू होईल.

- एस. आर. साबळे , सहायक अधीक्षक ,पुणे शहर पश्चिम विभाग.

'दत्तनगर येथील कार्यालयाचे स्थलांतर झाल्यानंतर आंबेगाव, जांभूळवाडी कोळेवाडी येथील जेष्ठ नागरिकांना छोट्या मोठ्या कारणासाठी कात्रजला जावे लागत होते.जाताना ज्येष्ठांना प्रवास करताना त्रासाला सामोरे कावे लागत होते.त्यामुळे आम्ही टपाल विभागाला आंबेगाव येथे नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली होती.

- चंद्रकांत गुरव , अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ जांभूळवाडी रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambegaon Super 23: Dilip Walse Patil Lauds Innovative Educational Initiative in Ghodegaon
Online Self-Enumeration Facility for Citizens
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव): तब्बल सव्वा महिन्यानंतर गावात गॅस टाक्या वितरण सुरू
Administrative Assurance: Tankers to be Deployed and Jal Jeevan Mission to be Streamlined by April 30
Marathi News Esakal
www.esakal.com