

पुणे - पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून (ता. २२) लागू झाल्याने पुणे महापालिकेत स्थायी समिती व प्रशासनाच्या स्तरावर मंजुरीसाठी असलेल्या विकास कामांना महिनाभर ब्रेक लागला आहे.
तर महापालिका आयुक्तांनी नागरिकांसाठी आवश्यक कामे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन केली जातील, ही कामे थांबणार नाहीत, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.