कऱ्हाड एसटी आगार

कऱ्हाड एसटी आगार
Published on

कऱ्हाडला पाच राजमाता जिजाऊ बस

आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या उपस्थितीत लोकार्पण

कऱ्हाड, ता. २१ ः येथील आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते आज त्या बसचे लोकार्पण झाले. नवीन बसमुळे प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आगारात हा कार्यक्रम झाला. आगारातून विविध मार्गांवर धावणाऱ्या बससेवेला या नवीन बसमुळे बळकटी मिळणार आहे. आमदार डॉ. भोसले यांनी प्रवाशांनी नवीन बससेवेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कऱ्हाड आगारासाठी भविष्यात आणखी नवीन बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी आमदार डॉ. भोसले यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाची माहिती घेतली. यावेळी आगार प्रमुख शर्मिष्ठा पोळ, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक शिवाजी पवार, सुहास जगताप, वैभव माने, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेंद्र माने, स्थानक प्रमुख किशोर जाधव, वाहतूक निरीक्षक शर्वरी पवार, सहायक वाहतूक निरीक्षक अनिल लटके, जय कदम यांच्यासह आगारातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. आगार व्यवस्थापक पोळ यांनी स्वागत केले.


W43884
कऱ्हाड ः आगाराच्या ताफ्यात दाखल झालेल्या पाच नवीन राजमाता जिजाऊ बसच्या लोकर्पणप्रसंगी डॉ. अतुल भोसले, शर्मिष्ठा पोळ आदी.
.................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com