पूरग्रस्त महिलांसाठी खास देवीचं 'लेणं'; तृतीयपंथियांनी दिल्या नव्या साड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्त महिलांसाठी खास देवीचं 'लेणं'; तृतीयपंथियांनी दिल्या नव्या साड्या

पूरग्रस्त महिलांसाठी खास देवीचं 'लेणं'; तृतीयपंथियांनी दिल्या नव्या साड्या

वडगाव शेरी : अनेक धार्मिक कार्यक्रमात भाविक मंडळी तृतीयपंथी समाजामार्फत देवीला साड्या अर्पण करतात. देवीला वाहिलेल्या अशा पन्नास नव्याकोऱ्या साड्या तृतीयपंथी समाजाने पूरग्रस्तांना मदत म्हणून देत मानवता धर्माचा अनोखा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे.

लोहगाव येथील भुमाता संघटनेतर्फे कोकणातील पूरग्रस्तांसाठी वस्तू रूपाने मदत गोळा करण्याचे काम सुरू होते. ही माहिती मिळाल्यानंतर महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लखन ओव्हाळ त्यांनी या मदत कार्यात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा: पुण्यातील 4 धरणांमध्ये मिळून 92 टक्के पाणी साठा

विविध धार्मिक कार्यक्रमात देवीला वाहिलेल्या 50 नव्या साड्या घेऊन लखन ओव्हाळ आणि संजय टाकळकर, कीर्ती टाकळकर, सोनाली माने, सोनी शहा ही तृतीयपंथी मंडळी भुमाता संघटनेचे प्रशांत जगताप यांच्या घरी दाखल झाली. भुमाता संघटनेकडे साड्या सुपूर्द करून संकटात सापडलेल्या कोकणवासीयांच्या मदतीसाठी त्यांनी खारीचा वाटा उचलला.

याबाबत प्रशांत जगताप म्हणाले, तृतीयपंथी उपेक्षित समाजाकडे आपण नेहमी मागणारा समाज म्हणून पाहतो. परंतु मनाने मोठा असणारा हा समाज केवळ मानवता धर्म समोर ठेवून मदतीला पुढे आला. संकटवेळी 'देण्याचा' हा गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे.

हेही वाचा: आखाड स्पेशल : नॉन-व्हेज तडक्याचा बेत 'या' डिशनं करा झणझणीत

लखन ओव्हाळ म्हणाले, लोहगाव येथे मंदिरात श्रीलक्ष्मी देवीची आणि तृतीयपंथी समाजाची ओटी भरण्याची प्रथा आहे. मी देवीचा सेवक आहे. ओटी भरणात आलेल्या पन्नास नव्या साड्या जमा झाल्या होत्या. कोकणावर आलेले संकट पाहता आमची मदत करण्याची इच्छा होती. त्या भावनेतून ही मदत केली. समाजाच्या कामी आल्याचे समाधान वाटले.

Web Title: New Sarees For Flood Hit Woman Donated By Transgender Women In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top