पिंपरी-चिंचवड शहरात तीन शिवभोजन केंद्रे सुरु

Shivbhojan
Shivbhojan

पिंपरी - शहरात आणखी तीन ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून ही तीनही केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे या केंद्रांची संख्या सात झाली असून दररोज सुमारे एक हजारहून अधिक गरजू नागरिकांच्या जेवणाची सोय होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारने जानेवारीपासून शिवभोजन योजना सुरू केली. शहरात सध्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय, महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारातील कॅन्टीन, वल्लभनगर एसटी आगार आणि आकुर्डी येथील प्राधिकरण कार्यालयाची इमारत या ठिकाणी ही केंद्रे सुरू आहेत. यामध्ये आणखी तीन केंद्रांची भर पडली आहे. भोसरी येथील श्रीराम कॉलनीमध्ये गणेश भाजी मार्केटजवळ स्वयं महिला बहुद्देशीय संस्था, औंध येथील जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय आणि सांगवी येथील गंगानगर येथे ही नवीन केंद्रे सुरू करण्यात आली आहे. या तीनही केंद्रांवर प्रत्येकी किमान 75 तर जास्तीतजास्त 150 थाळींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे तेथील रुग्णांची चांगली सोय होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com