

PUN26B01738
पुणतांबे ः येथील नवीन रोहित्राचे डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
रोहित्रामुळे कोकरे वस्तीवरील विजेचा प्रश्न मार्गी
पुणतांबे, ता. २५ ः दुष्काळी स्थिती, विजेची गंभीर समस्या, अशी स्थिती असताना शेतकऱ्यांनी नवीन वीज रोहित्र मागणी केले होते. मात्र महावितरणकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत होते. शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे रोहित्र मिळावे, म्हणून मागणी केली होती. या मागणीला यश आले. रोहित्र तातडीने मिळाले. विजयादशमीला जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते हे रोहित्र लोकार्पण झाले. जळगाव हद्दीतील कोकरेवस्ती येथील शेतकऱ्यांनी हा विजेचा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले.
येथील विद्युत रोहित्रावर मोठा भार होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब धनवटे यांनी मंत्रिमहोदयांच्या कानावर घातली. युवा नेते डॉ. सुजय विखे यांनीही या कामाचा पाठपुरावा केला. शेतकऱ्यांना रोहित्र मिळवून दिले. विजेचा प्रश्न सुटल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याची सोय झाली. शेतकऱ्यांनी या नवीन रोहित्राची विधिवत पूजा केली. यावेळी शुक्लेश्वर पेटकर, सुरेश शिंदे, रखमाजी कोकरे, रणजित वाघ, पापाभाई शेख आदी शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.